छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथे भक्तनिवास, दर्शनबारी, ‎‎फंक्शन हॉल, व्यावसायिक‎ कॉम्पलेक्स, उद्यान, लाइट अँड‎साऊंड शो, घाट सुशोभीकरण,‎ पार्किंग आदी कामांना मंजुरी देण्यात ‎‎आली आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर ‎‎ज्योतिर्लिंग मंदिरालगत ४३ कोटी‎ रुपये खर्चून चौपदरी बायपास रस्ता ‎‎होणार आहे. मंदिर परिसरातील‎ विविध विकासकामांसाठी ५३‎ कोटींचा वाढीव निधी गुरुवारी ‎‎उच्चधिकारी समितीने मंजूर केला.‎त्यामुळे एकूण निधी १५६ कोटींवरून‎ २१० कोटींवर गेला आहे. निविदा‎ आणि वर्कऑर्डरची प्रक्रिया पूर्ण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झाली आहे.

मुख्य सचिव राजेशकुमार, सचिव‎वेणुगोपाल रेड्डी यांनी ऑनलाइन‎व्हीसी घेतली. जिल्हाधिकारी दिलीप‎ स्वामी, नियोजन अधिकारी भारत‎वायाळ बैठकीला उपस्थित होते. १५६‎ कोटींच्या आराखड्यात ९१ कोटींची‎ वाढीव मागणी प्रशासनाने केली होती.‎त्यानुसार ११२ कोटींपर्यंतची कामे‎ नव्याने समाविष्ट करून २१० कोटींचा‎ परिपूर्ण आराखडा तयार करण्यात‎ आला आहे. बहुतांश कामांना गती‎ दिल्याबद्दल मुख्य सचिवांनी‎जिल्हाधिकारी स्वामी यांचे कौतुक‎ केले. नवीन आराखड्याध्ये मंदिरातील‎ प्रशासकीय कार्यालय बाहेर हलवले‎ जाणार आहे. २०१८ पासून कागदावर‎ असलेल्या या प्रकल्पाला जानेवारी‎२०२६ पासून प्रत्यक्ष गती मिळणार‎ आहे. बायपाससह उर्वरित कामांना‎ लवकरच गती मिळेल.‎

बांधकाम विभाग ११२‎ कोटींची कामे करणार‎

२१० कोटींच्या आराखड्यात ११२‎कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम‎ विभाग करणार आहे. ४३ कोटींचा‎ बायपास रस्ता होणार आहे. पुरातत्त्व‎ विभागाच्या हद्दीत १३ कोटींची कामे‎ होतील. महावितरण, एमटीडीसी,‎ विद्युत विभाग, जीवन प्राधिकरण‎यांच्या विविध कामांचाही या वाढीव‎ आराखड्यात समावेश आहे.‎

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

671 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क