छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव–धुळे या मार्गावर नांदगाव–तलवाडा घाट–शिऊर बंगला परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अवजड वाहतुकीवर तात्पुरती मर्यादा घालण्यात आली आहे. दि. २५ नोव्हेंबर २०२५ पासून ते २५ एप्रिल २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड आणि जड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले आहेत.

रस्त्याचे काम सुरू असलेल्या घाट विभागात अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढू नये तसेच कामाचा वेग वाढून वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. या काळात घाटमार्ग पूर्णपणे अवजड वाहनांसाठी बंद राहणार असून खालील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

१. छत्रपती संभाजीनगर–चाळीसगाव अवजड वाहतूक:

छत्रपती संभाजीनगर–साजापूर–लासूर–गंगापूर चौफुली–वैजापूर–येवला–मनमाड मार्गे चाळीसगाव–धुळे येथे पोहोचता येईल.

२. छत्रपती संभाजीनगर–धुळे अवजड वाहतूक:

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गाद्वारे साजापूर–माळीवाडा–समृद्धी महामार्ग–झांबरगाव येथे उतरून गंगापूर चौफुली–वैजापूर–येवला–मनमाड मार्गे धुळे येथे जाता येईल.

३. जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:

छत्रपती संभाजीनगर–साजापूर–कसाबखेड फाटा–देवगाव रंगारी–शिऊर–वैजापूर मार्गे पुढे येवला–मनमाड–चाळीसगाव–धुळे असा पर्यायी मार्ग लागू राहील.

या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन रस्त्याचे काम सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. वाहनचालकांनी दिलेल्या मार्गांचा काटेकोर वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,040 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क