छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत ९.५४ लाख वाहनांपैकी केवळ ३ लाख ८ हजार वाहनांवरच एचएसआरपी बसवण्यात आली आहे. तर तब्बल ६.४५ लाख वाहनांवर ही अनिवार्य नंबर प्लेट बसवणे अद्याप बाकी आहे. ३१ डिसेंबरपर्यंतची शेवटची मुदत शिल्लक असताना केवळ २९ दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने प्लेट बसविणे आव्हानात्मक असल्याची चर्चा सुरु आहे.

राज्य शासनाने वाहनधारकांना अनेकदा मुदतवाढ देऊन सवलत दिली होती. मात्र आता दिलेली नवीन मुदत अंतिम असल्याचे प्रशासन स्पष्ट करत आहे. एका महिन्याच्या आत सर्व वाहनांवर प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाणार का, किंवा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कठोर कारवाईला सुरुवात होणार, याबाबत वाहनधारकांमध्ये संभ्रम आहे. संभाव्य दंड आणि कारवाई टाळण्यासाठी अनेक वाहनधारक अधिकृत पोर्टलवर जाऊन क्रमांक प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी करत आहेत.

जिल्ह्यातील ३ लाख ८ हजार ५८ वाहनांवर एचएसआरपीची बसवणी पूर्ण झाली आहे. तर ३ लाख ५९ हजार ११२ वाहनांनी नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केले आहे. मात्र २ लाख ८६ हजार ८३० वाहनधारकांनी अद्याप या प्रक्रियेपासून दूर राहणे सुरूच ठेवले आहे, ज्यामुळे अंतिम क्षणी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट केवळ नियमानुसार अनिवार्य नाही तर वाहन सुरक्षा, चोरी प्रतिबंध आणि ट्रॅकिंगसाठीही महत्त्वपूर्ण आहे. अंतिम मुदत जवळ येत असल्याने वाहनधारकांनी विलंब न करता नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

544 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क