अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील ३ रीच्या वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर ऊर्फ भोऱ्या वजीरने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या छोट्याशा मुलाने आपल्या स्वातंत्र्याचा व समाजातील मुलांच्या हक्कांचा उहापोह करत सरकारकडे विशेष मागणी केली आहे.
भोऱ्या वजीरने आपल्या भाषणात मोठ्या पोरांना सरकारने पगार सुरू केल्यावर बारक्या पोरांना का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. सुट्टीच्या दिवशी मुलांना घरची कामं करायला लावली जातात, ज्यामुळे स्वातंत्र्याचा उपयोगच होत नाही, असा टोला त्याने लगावला आहे. “मोठ्या माणसांनी स्वातंत्र्याचा गलत इस्तेमाल केला, आता आम्हाला खरंच स्वातंत्र्य आहे का?” असा प्रश्न विचारत त्याने सरकारला सर्व मुलांना पगार सुरू करण्याची मागणी केली आहे.
“सरकारने ‘बारीक-सारीक लाडका लेकरू योजना’ सुरू करून सगळ्या मुलांना पगार द्यावा,” असा सल्ला भोऱ्याने दिला आहे. इंग्रजांच्या जुलमी काळाची आठवण करून देत, मुलांना कष्ट करण्याची गरज आहे, आळशी पिढी तयार होऊ नये, असेही त्याने सांगितले.
भोऱ्या वजीरच्या या भाषणाने सर्वांनाच विचार करायला लावले असून, लहान मुलांच्या स्वातंत्र्याचा आवाज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*