छत्रपती संभाजीनगर : शहरात आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर क्रांती चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त आज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत क्रांती चौक परिसरातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) यांच्या पुढाकारातून क्रांती चौक येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जतन करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या उद्यानात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडत आहे. या उद्यानात २१० फूट उंचीचा भव्य ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून, त्याठिकाणी परमवीर चक्र गॅलरीही विकसित करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना मानवंदना देणारा हा उपक्रम शहरासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

आज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सीएमआयएचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

क्रांती चौक ते गोपाल टी हा मार्ग दोन्ही बाजूंनी सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून चुन्नीलाल पेट्रोल पंप, एस.एस.सी. बोर्ड ते भाजप कार्यालय या मार्गाचा वापर करावा. तसेच गोपाल टी, संत एकनाथ रंगमंदिर, उत्सव चौक, रमानगर या मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व वेळेचे योग्य नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

399 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क