छत्रपती संभाजीनगर : जागतिक पर्यटन नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराला आता विमानतळावरूनच नवी आणि अभिमानास्पद ओळख मिळू लागली आहे. काही दिवसांपूर्वी विमानतळाचे अधिकृत नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर विमानतळ’ असे करण्यात आल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. विमानतळावर ‘छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे’ असा भव्य आणि आकर्षक स्वागत फलक लावण्यात आला असून, प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा बदल केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते आतील विविध ठिकाणी नव्या नावाचे फलक लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे शहराची ऐतिहासिक ओळख अधिक ठळकपणे समोर येत असून, विमानतळाचे संपूर्ण स्वरूपच बदलताना दिसत आहे.
यापूर्वी ‘औरंगाबाद’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानतळावर आता ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव झळकू लागल्याने स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर उतरतानाच शहराच्या नव्या नावाची, इतिहासाची आणि अस्मितेची जाणीव होत असून, हा बदल शहराच्या गौरवात भर घालणारा ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*