छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत इंधन खरेदीवर तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत. या निर्णयानुसार, दुचाकी वाहनांना केवळ २०० रुपयांपर्यंत पेट्रोल देण्यात येणार असून, तीन व चारचाकी वाहनांसाठी ही मर्यादा २००० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पेट्रोल पंपांवरील अनावश्यक गर्दी कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना इंधनाचा नियमित पुरवठा सुनिश्चित होणार आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवड्याची कोणतीही परिस्थिती नाही. मात्र, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त इंधन भरून घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता फक्त आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे. तसेच पेट्रोल पंप चालकांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या उपाययोजनांमुळे इंधनाचा योग्य व समतोल पुरवठा राखला जाईल आणि सर्व नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,079 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क