छत्रपती संभाजीनगर :  शहरात फॉरेक्स ट्रेडिंग आणि पेमॅक्स ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिन्याला २ ते १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवत आरोपींनी नागरिकांना गुंतवणुकीस प्रवृत्त करून तब्बल १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी २५ मार्च रोजी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात गुरुप्रसाद शंकर चव्हाण, सुपर्णा गुरुप्रसाद चव्हाण (रा. विरार, ठाणे), विठ्ठल भागाजी तांदळे, सुधाकर खंडागळे (रा. छत्रपती संभाजीनगर), तरुणा चव्हाण, सोनी मनचंदाणी (रा. ठाणे) यांच्यासह अन्य एका आरोपीचा समावेश आहे. फिर्यादी महिलेच्या ओळखीचा फायदा घेत विठ्ठल तांदळे याने सुरुवातीला विश्वास संपादन केला. त्याने ‘व्हिक्टरी ट्रेडर्स’ या नावाने कार्यालय सुरू करून अनेकांना गुंतवणुकीस भाग पाडले.

आरोपींनी सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास निर्माण केला. त्यानंतर मोठ्या रकमांची गुंतवणूक करून घेतली आणि अचानक परतावा देणे बंद केले. फोन उचलणे टाळणे, संपर्क तोडणे अशा पद्धतीने त्यांनी गुंतवणूकदारांना फसवले. दुबई आणि मॉरिशस येथे कंपनीचे मुख्य कार्यालय असल्याचे सांगत त्यांनी जळगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये सेमिनारही घेतले होते.

तपासात समोर आले की, आरोपींनी विविध कंपन्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या फसवणुकीत ११ गुंतवणूकदारांची मोठी रक्कम अडकली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत असून, आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

738 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क