छत्रपती संभाजीनगर :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात होणारी गर्दी आणि मिरवणुका लक्षात घेऊन, शहर वाहतूक विभागाने आज आणि उद्या (14 एप्रिल) रोजी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली आहे. 

नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवांना सूट:  हे वाहतूक बदल पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी लागू असणार नाहीत.

१३ एप्रिल रोजीचे वाहतूक बदल (सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत) 

बंद मार्ग: मिलकॉर्नर ते सिटी क्लब या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

पर्यायी मार्ग: 

* जळगावकडून येणारी वाहने:  हर्सूल टी – जळगाव टी – जालना रोड – अमरप्रीत चौक – महावीर चौक या मार्गे ये-जा करतील.

* दिल्ली गेटकडून येणारी वाहने:  सिटी क्लब – महापालिका कार्यालय – टाऊन हॉल उड्डाणपुलाखालून – मकईगेट – बेगमपुरा – विद्यापीठ मार्गे पुढे जातील. तसेच, दुसरीकडे सिटी बस महानगरपालिका – मुलींचे आयटीआय – खडकेश्वर मार्गेही पुढे जाता येईल.

* मध्यवर्ती बसस्थानकाकडून येणारी वाहने: मिलकॉर्नर – महावीर चौक – क्रांती चौक – आकाशवाणी मार्गे ये-जा करतील.

१४ एप्रिल रोजीचे वाहतूक बदल (सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत)

मंगळवारी जयंतीच्या मुख्य दिवशी खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद  राहतील:

१. महावीर चौक ते अमरप्रीत चौक.

२. गोपाल टी – क्रांती चौक – सिल्लेखाना – पैठणगेट – बाराभाई ताजिया – गुलमंडी – सुपारी हनुमान मंदिर – सिटी चौक – जुना बाजार – मुख्य पोस्ट ऑफिस – भडकल गेट.

३. शहागंज – गांधीपुतळा – सराफा – सिटी चौक.

४. औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजीया.

५. मिल कॉर्नर ते सिटी क्लब.

 

मिरवणूक मार्गावरील बदल:  एन-१२ नर्सरी, गोदावरी पब्लिक स्कूल ते टीव्ही सेंटर, एन-९, अयोध्यानगर ते शिवनेरी कॉलनी, आणि एन-७ ते शॉपिंग सेंटर या मार्गावरून मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मिरवणूक संपेपर्यंत ‘एकेरी मार्गावरून’ (One-Way) वळविण्यात येणार आहे.

(नागरिकांनी घराबाहेर पडताना या मार्गांची नोंद घ्यावी जेणेकरून गैरसोय टळेल.)

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

781 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क