छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील गाजलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मतीन पटेल यांना आरोपी केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
ज्या घरात निदा खान लपून राहत होती, ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचा ठपका ठेवत महापालिकेने संबंधित घराला नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरावर नोटीस चिटकवून तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित बांधकामावर बुलडोझर चालवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण कारवाईमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महापालिका प्रशासन आता कोणत्याही बेकायदेशीर बांधकामाविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*