छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक आणि राज्यसंरक्षित भडकल गेट स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामाला आता वेग आला असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच कामादरम्यान होणारी वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी भडकल गेटमधून होणारी सर्व प्रकारची वाहतूक ११ मेपासून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आली आहे.

भडकल गेट परिसरात सध्या दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री व मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बंदोबस्त प्रभारी अधिकाऱ्यांना गरजेनुसार वाहतुकीत आणखी बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा तसेच फौजदारी कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून जुना बाजार ते भडकल गेट दरम्यान मुलींची आयटीआय, रुचिरा स्वयंपाक घर आणि ज्युबिली पार्क मार्ग सुचविण्यात आला आहे. तसेच भडकल गेट ते जुना बाजारसाठी टाऊन हॉल पुलाखालून, मलिक अंबर चौक आणि पालिका कार्यालय मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

497 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क