छत्रपती संभाजीनगर : खेळण्यांच्या दुनियेत रमण्याच्या वयात एका चिमुकलीने थेट मनोरंजन विश्वात दमदार एन्ट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीव्ही सेंटर परिसरातील अवघ्या एक वर्षांच्या तिशा आकाश गायकवाड हिची सध्या जाहिराती, मालिका आणि चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे.
गोंडस चेहरा, निरागस हास्य आणि कॅमेऱ्यासमोरची सहज वावर यामुळे तिशाने अल्पावधीतच निर्माते आणि दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक अॅड शूट आणि प्रिंट शूटमध्ये झळकल्यानंतर तिने लोकप्रिय ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आता तिशासाठी आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक Ganesh Acharya यांच्या आगामी चित्रपटात तिशा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती गणेश आचार्य यांच्या बहिणीच्या बालपणीची भूमिका साकारणार असून तिच्या अभिनयाची विशेष चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे हा चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा प्रवास प्रतिष्ठित Filmfare Awards पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढ्या लहान वयात इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनल्याने तिशावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तिशाचे वडिलांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून आई शिक्षिका आहे. कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे तिशा आज मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
“ही चिमुकली पुढे मोठी स्टार होणार,” अशी भावना आता परिसरातून व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*