छत्रपती संभाजीनगर :  शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दर स्थिर असताना अचानक झालेल्या या वाढीमुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलचा जुना दर 105.42 रुपये होता. तो आता वाढून 108.56 रुपयांवर पोहोचला असून तब्बल 3.14 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पॉवर पेट्रोलचा दर 114.45 रुपयांवरून 117.59 रुपयांपर्यंत गेला आहे. यातही 3.14 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

डिझेलच्या दरातही वाढ झाली असून जुना दर 91.90 रुपये होता. तो आता 95.01 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच डिझेलमध्ये 3.11 रुपयांची वाढ झाली आहे.

इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असल्याने भाजीपाला, अन्नधान्य तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रोज प्रवास करणारे नागरिक, ऑटोचालक आणि मालवाहतूक व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने इंधन दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,799 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क