मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र आता राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेद्वारे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचे एसएमएस देखील प्राप्त होऊ लागले आहेत.

मार्च महिन्यापासून योजनेचे हप्ते थांबले होते. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळतील अशी अपेक्षा लाभार्थींना होती. परंतु प्रत्यक्षात अनेक महिलांच्या खात्यात केवळ 1500 रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ सरकारकडून सध्या फक्त मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

दरम्यान, योजनेसाठी ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतर शासनाने लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण करून पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. मात्र एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते नेमके कधी जमा होणार याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या योजनेशी संबंधित आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक लाभार्थींनी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, लाभार्थींनी आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी बँकेकडून आलेला एसएमएस पाहावा. तसेच मिस्ड कॉल, नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे किंवा एटीएमद्वारेही खात्याची शिल्लक तपासता येणार आहे. गरज पडल्यास थेट बँकेत जाऊन माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,050 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क