छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मदतीच्या बहाण्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २८ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास पाचोड परिसरात जोरदार वारे वाहत होते. त्यावेळी संबंधित वृद्ध महिला रस्त्यावर अडचणीत सापडली होती. याच वेळी रोहन आहेर नावाचा युवक तेथे उपस्थित होता. वृद्धेची परिस्थिती पाहून मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिला आपल्या घरी नेले. वृद्ध महिलेलाही त्याचा आधार वाटल्याने ती त्याच्यासोबत गेली.

मात्र, घरात नेल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारादरम्यान वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक आणि महिलांचे लक्ष वेधले गेले. आवाज ऐकताच काही नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीच्या तावडीतून वृद्ध महिलेची सुटका केली आणि घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली.

घटनेनंतर वृद्ध महिला आणि तिच्या नातेवाईकांनी पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपी रोहन आहेर याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिला आणि तरुणींसोबतच आता वृद्ध महिलादेखील सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,218 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क