छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (दि. २) पार पडली. या छाननी प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला असून, प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह एकूण सहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी (दि. १) सात उमेदवारांनी एकूण १२ अर्ज दाखल केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी.सी. आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली.

छाननीदरम्यान अपक्ष उमेदवार विशाल नांदरकर यांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. तर उर्वरित सहा उमेदवारांचे अर्ज नियमांनुसार योग्य आढळल्याने त्यांना निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, या निवडणुकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचे तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,557 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क