जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या ३६,७७२ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत असून पाणीपातळी ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह नगर जिल्ह्याच्या काही भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
गतवर्षी याच दिवशी धरणातील पाणीपातळी ३३.६६ टक्के होती, तर यावर्षी ती ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. जायकवाडीच्या उजव्या व डाव्या कालव्यातून सुमारे १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. पाणीपातळी ३३ टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर सिंचनासाठी पाणी सोडले जाते, ज्यामुळे शेतकरी आणि इतर पाणीपुरवठ्याच्या गरजा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सध्या जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत असल्याने, येत्या काही दिवसांत परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे जायकवाडीचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*