छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसरातील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडली असून, टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित शिक्षक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी शाळेतून टीसी घेण्यासाठी आला होता. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी यापूर्वी शाळेत शिक्षण घेत असताना त्याचे वर्गशिक्षकांसोबत अनेकदा वाद झाले होते. तसेच, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू विद्यार्थ्याने ऑनलाइन मागविल्याची माहितीही समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,121 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क