छत्रपती संभाजीनगर : एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (AAI) राष्ट्रीय ग्राहक समाधान सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर विमानतळाने देशातील ६० विमानतळांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या दोन वर्षांत २३ व्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकापर्यंत मजल मारत विमानतळाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक सुविधा, स्वच्छतेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य आणि स्थानिक संस्कृतीचा केलेला प्रभावी समावेश यामुळे हे यश मिळाल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

विमानतळावर प्रवाशांसाठी ३०० पुस्तकांची लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. प्रवासी पुस्तक पूर्ण वाचू शकले नाहीत, तर ते सोबत घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली असून नंतर ड्रॉपबॉक्स किंवा मुंबई विमानतळावर ते परत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच प्रतीक्षेचा वेळ आनंददायी व्हावा यासाठी कॅरम खेळण्याची सुविधा, मुलांसाठी बास्केटबॉल, सीसॉ बॅलन्स, घसरगुंडी यांसह स्वतंत्र किड्स झोन तयार करण्यात आला आहे.

स्थानिक महिला बचत गटांना विमानतळावर विशेष काउंटर उपलब्ध करून देण्यात आले असून येथे भडंग, चिवडा, शंकरपाळे आणि थालीपीठ यांसारखे पारंपरिक पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख होत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नॅकबार, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लाउंज, पॅन्ट्री आणि दर मिनिटाला होणारी स्वच्छता यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर झाला आहे.

शहरात वाढणारे उद्योग आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन टियर-वन शहरांच्या धर्तीवर विमानतळाचा सर्वांगीण विकास सुरू आहे. विमानतळ संचालक शरद येवले यांनी सांगितले की, “गेल्या दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे देशात प्रथम क्रमांक मिळवता आला. आता हा दर्जा आणि प्रवाशांचा विश्वास कायम राखणे हेच आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.” यावेळी अधिकारी वैशाली अंडे, नीलेश धावरे आणि सनी दास यांनीही विविध विकासकामांची माहिती दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

568 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क