छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच ग्रामीण भागातील इच्छुक नागरिकांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या उपक्रमाद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही संबंधित तांत्रिक सेवा तसेच फ्रँचायझी मॉडेल आणि ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणीसारख्या विविध व्यवसाय संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ईव्ही क्षेत्र वेगाने विस्तारत असल्याने या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अमृतच्या या विशेष उपक्रमात सहभागी लाभार्थ्यांना मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ मिळणार असून त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यास हातभार लागणार आहे.

ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असून अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक आणि कार्यालयांची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,066 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क