छत्रपती संभाजीनगर : दहावीनंतरच्या तीन वर्षांच्या पूर्णवेळ पदविका (डिप्लोमा) पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र अपलोड आणि अर्ज निश्चितीची अंतिम मुदत ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठ संचालित तसेच खासगी विनाअनुदानित पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी गुरुवार (२ जुलै) सायंकाळपर्यंत १ लाख ३३ हजार १६९ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २० हजार जागांसाठी २४ हजार ६५ अर्ज निश्चित झाल्याची माहिती सहसंचालक डॉ. किरण लाढाणे यांनी दिली.

तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, ६ जुलैनंतर प्राप्त होणारे अर्ज केवळ संस्थास्तरीय (Institute Level) आणि कॅपबाह्य (Non-CAP) प्रवेशासाठीच ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी अर्जातील माहितीची स्वयंपडताळणी करूनच प्रवेशासाठी जागा स्वीकारावी. तसेच प्रवेश निश्चित करताना ‘Freeze’ किंवा ‘Not Freeze (Betterment)’ हा पर्याय काळजीपूर्वक निवडावा, असेही संचालनालयाने सांगितले आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास जवळच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधावा किंवा हेल्पलाइन क्रमांक ७२४९७२४४१८ (सकाळी १० ते सायंकाळी ६) वर संपर्क साधता येणार आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक

ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र अपलोड : ६ जुलै

कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती : ६ जुलै

तात्पुरती गुणवत्ता यादी : ७ जुलै

हरकती नोंदविण्याची मुदत : ८ ते ९ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी : १० जुलै

कॅप फेरी – १

– जागा जाहीर : १० जुलै

– पर्याय फॉर्म भरणे : ११ ते १३ जुलै

– जागावाटप : १५ जुलै

– जागा स्वीकार : १६ ते १८ जुलै

– संस्थेत प्रवेश निश्चिती : १६ ते १८ जुलै

कॅप फेरी – २

– रिक्त जागा जाहीर : १९ जुलै

– पर्याय फॉर्म : २० ते २१ जुलै

– जागावाटप : २३ जुलै

– जागा स्वीकार : २४ ते २५ जुलै

– प्रवेश निश्चिती : २४ ते २५ जुलै

कॅप फेरी – ३

– रिक्त जागा जाहीर : २६ जुलै

– पर्याय फॉर्म : २७ ते २८ जुलै

– जागावाटप : ३० जुलै

– जागा स्वीकार : ३१ जुलै ते १ ऑगस्ट

– प्रवेश निश्चिती : ३१ जुलै ते १ ऑगस्ट

कॅप फेरी – ४

– रिक्त जागा जाहीर : २ ऑगस्ट

– पर्याय अर्ज : ३ ते ४ ऑगस्ट

– जागावाटप : ६ ऑगस्ट

– जागा स्वीकार : ७ ते ८ ऑगस्ट

– प्रवेश निश्चिती : ७ ते ८ ऑगस्ट

संस्थास्तरीय प्रवेश

– अर्ज स्वीकार : ७ ऑगस्टपर्यंत

– संस्थास्तरीय व रिक्त जागांवरील प्रवेश : ९ ते १२ ऑगस्ट

– उर्वरित रिक्त जागांवरील अंतिम प्रवेश : १३ ते १४ ऑगस्ट

– सर्व प्रकारच्या प्रवेशासाठी अंतिम मुदत : १४ ऑगस्ट २०२६

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

888 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क