मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यापुढे कोणत्याही शाळेपासून ५०० मीटरच्या परिसरातील दुकानांमध्ये ‘स्टिंग’ (Sting) एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत याबाबत घोषणा केली. लहान मुलांच्या आरोग्यावर कॅफिनयुक्त पेयांचा होणारा संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री झिरवाळ म्हणाले की, शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांची विक्री आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषदांनाही अशा प्रकारची माहिती तातडीने अन्न व औषध प्रशासनाला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

यावेळी मंत्री झिरवाळ यांनी राज्यातील अन्न तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची माहितीही दिली. सध्या छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई येथे तीन अन्न तपासणी प्रयोगशाळा कार्यरत असून, रायगड, नाशिक, यवतमाळ आणि पुणे येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीत आणखी २२ प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एप्रिल २०२५ ते मे २०२६ या कालावधीत स्टिंग एनर्जी ड्रिंकचे २७ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी १० नमुने प्रमाणित आढळले आहेत. तसेच विविध एनर्जी ड्रिंकचे ११५ नमुने तपासण्यात आले असून ६३ नमुने प्रमाणित, एक नमुना कमी दर्जाचा आणि सहा नमुने मिथ्याछाप असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित नमुन्यांची तपासणी अद्याप सुरू असल्याची माहितीही मंत्री झिरवाळ यांनी सभागृहात दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,344 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क