छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता ज्यूस सेंटरवरही धडक कारवाई करत अन्न सुरक्षेबाबत गंभीर अनियमितता उघडकीस आणल्या आहेत. पैठण गेट परिसरातील मे लकी ज्युस सेंटर येथे अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांच्या पथकाने गुरुवारी अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्यूस तयार करण्यासाठी मुदतबाह्य टोनड दूध आणि अल्फान्सो मॅंगो पल्पचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार लक्षात येताच संबंधित साठा तातडीने जप्त करून नष्ट करण्यात आला.

यावेळी तपासणीदरम्यान आईस्क्रीमऐवजी फ्रोजन डेझर्टचा वापर केला जात असल्याचे तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित व्यावसायिकांना कठोर सूचना देण्यात आल्या. याच मोहिमेअंतर्गत मे फ्रेश ज्युस सेंटर आणि न्यू लकी ज्युस सेंटर येथेही तपासणी करण्यात आली. या ठिकाणी स्वच्छता, अन्नपदार्थांची साठवणूक आणि गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना गुणवत्ता, स्वच्छता आणि उत्पादनाची मुदत तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे. तपासणी अहवालाच्या आधारे संबंधित व्यावसायिकांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,557 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क