छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) शहरात विविध अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने शहरातील काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार भडकल गेट ते अण्णाभाऊ साठे चौक हा मार्ग शनिवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय उद्धवराव पाटील चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, विभागीय आयुक्त निवासस्थान (टी-पॉइंट) ते अण्णाभाऊ साठे चौक तसेच चेलीपुरा चौक ते चांदणे चौक मार्गे अण्णाभाऊ साठे चौक हे मार्गही बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. भडकल गेटकडून येणाऱ्या वाहनांनी जुना बाजार – सिटी चौक – चेलीपुरा चौक – चंपा चौक या मार्गाचा वापर करावा. उद्धवराव पाटील चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी सत्यविष्णू हॉस्पिटल चौक – सिद्धार्थ चौक – टीव्ही सेंटर हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल. तसेच एन-१२ स्वर्ग हॉटेल ते टीव्ही सेंटर मार्गेही वाहतूक वळविण्यात येणार आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त निवासस्थान (टी-पॉइंट) परिसरातून येणाऱ्या वाहनांनी चंपा चौक – चेलीपुरा चौक – सिटी चौक या मार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र जुना बाजार – चंपा चौक हा मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

शनिवारी शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच अनावश्यक गर्दी टाळून पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,260 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क