छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केल्यानंतर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. जावळे आणि डॉ. पगारे यांच्या ‘जयंती 2’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित क्षण अखेर जवळ आला आहे. सामाजिक आशयाला मनोरंजनाची जोड देणारा हा चित्रपट उद्या, ११ सप्टेंबर रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
‘जयंती 2’च्या घोषणेपासूनच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी आणि पडद्यावर साकारलेली कथा याबाबत जाणून घेण्यासाठी चित्रपटप्रेमी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, संभाजीनगरमधील दोन डॉक्टरांनी निर्मितीची जबाबदारी स्वीकारल्याने स्थानिक पातळीवरही या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असतानाही सिनेमा या वेगळ्या माध्यमात काहीतरी करण्याची धडपड डॉ. जावळे आणि डॉ. पगारे यांनी केली आहे. त्यामुळे ‘जयंती 2’ हा केवळ एक चित्रपट प्रदर्शन नसून संभाजीनगरच्या कलाक्षेत्रासाठीही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या निर्मात्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, सोशल मीडिया आणि चित्रपटप्रेमींमध्येही चर्चेला उधाण आले आहे. आता उद्या चित्रपटगृहात झळकल्यानंतर प्रेक्षक या कलाकृतीला किती पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*