छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) नोंदणीला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध एसटी आगारांसह खासगी एजन्सीधारकांकडे तब्बल ५ लाख १५ हजार ३३७ सवलतधारकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असून, एकूण नोंदणीपैकी सुमारे ७८ टक्के लाभार्थी महिला आहेत.

विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सन्मान योजनेअंतर्गत ४ लाख २ हजार ३६४ महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. याशिवाय अमृत ज्येष्ठ नागरिक ७० हजार ७१४, ज्येष्ठ नागरिक ३३ हजार ६३०, तर इतर सवलतधारक ८ हजार ६२९ जणांनी नोंदणी केली आहे.

एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये तसेच खासगी एजन्सीच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थींना कार्ड वितरणाचे कामही सुरू आहे.

दरम्यान, अद्याप अनेक सवलतधारकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे उर्वरित लाभार्थी नोंदणी करण्यासाठी आगार आणि अधिकृत केंद्रांवर गर्दी करत आहेत. आगामी काळात नोंदणीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील नोंदणी :

अमृत ज्येष्ठ नागरिक – ७०,७१४

ज्येष्ठ नागरिक – ३३,६३०

महिला सन्मान योजना – ४,०२,३६४

इतर – ८,६२९

एकूण – ५,१५,३३७

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

368 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क