आपल्या अभिनयातून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पहाटे 5.20 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे उपचार करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा मल्हार पाटेकर यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
विश्वनाथ दिनकर पाटेकर अर्थात नाना पाटेकर यांनी रंगभूमीपासून आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. पुढे मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांच्या दमदार संवादफेकीसह अभिनयातील सहजता आणि व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतण्याची शैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.
‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘तिरंगा’, ‘अब तक छप्पन’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनयासोबतच सामाजिक विषयांवरील त्यांची भूमिका आणि स्पष्टवक्तेपणामुळेही ते कायम चर्चेत राहिले.
नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*