छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडीतील धुळे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. मक्याची वाहतूक करणाऱ्या १२ चाकी ट्रकने उतारावर नियंत्रणाबाहेर जात एका कारसह दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.५० वाजता ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नोंदणी क्रमांक असलेला ट्रक (आरजे १७-जीए-५५६४) बीडकडून सुमारे ३५ टन मका घेऊन येत होता. कांचनवाडी उड्डाणपुलावरून पैठण रोडच्या दिशेने उतरताना चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर ट्रकची कारला (एमएच २०-जीझेड-१२३१) धडक बसली. पुढे जात असलेल्या दोन रिक्षाही ट्रकच्या धडकेत सापडल्या. या रिक्षांचे क्रमांक एमएच २०-ईके-८६१३ आणि एमएच २०-ईके-६२१० असे आहेत.

ट्रकच्या जोरदार धडकेमुळे तिन्ही वाहने सुमारे ३० ते ४० फूट ओढली गेली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये जाऊन पडली. कारचा अक्षरशः चुराडा झाला. त्यात चालक अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी कारचालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

या दुर्घटनेत विष्णू जायभाये, संजय आश्रुबा आघाव, देवानंद आघाव, वैभव गजभिये, सचिन केदार, चंचल तोतला आणि सविता शहाणे यांच्यासह आठ जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,247 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क