छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गोलवाडी येथील ‘मे. द मेपल लॉन अँड रेस्टॉरंट’ या आस्थापनेचा अन्न परवाना तातडीने निलंबित केला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले.

अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी १२ ऑक्टोबर रोजी गोलवाडी लिंक रोडवरील या रेस्टॉरंटची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत अन्नसुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. FoSCoS तपासणी अहवालानुसार, ९६ पैकी केवळ १७ गुण म्हणजेच १८ टक्के गुण मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

स्वयंपाकघरातील अस्वच्छता उघड

तपासणीदरम्यान रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात आणि परिसरात अस्वच्छता आढळली. फरशा तुटलेल्या होत्या, भिंतींचे प्लास्टर उखडलेले होते, तर रंगाचे पापुद्रे निघाल्याचेही निदर्शनास आले. खिडक्या आणि दरवाजे उघडे असल्याने कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव असल्याचे आढळले. अन्न साठवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रिज गंजलेला आणि तुटलेल्या अवस्थेत होता.

तसेच कच्चे व शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे न ठेवता एकत्र साठवले जात असल्याचे तपासणीत समोर आले. पिण्याचे पाणी आणि कच्च्या मालाच्या गुणवत्तेची तपासणी केली जात नसल्याचेही नमूद करण्यात आले. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे तसेच एप्रन, हातमोजे आणि डोक्याचे आच्छादन यांसारख्या सुरक्षित पोशाखांचीही कमतरता आढळली.

सुधारणा आणि फेरतपासणीनंतरच निर्णय

या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ३२ अंतर्गत परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. या काळात रेस्टॉरंटमध्ये अन्ननिर्मिती, विक्री, साठवणूक आणि वितरण करण्यास बंदी असेल. सर्व त्रुटी दूर करून अनुपालन अहवाल सादर केल्यानंतर प्रशासनाकडून प्रत्यक्ष फेरतपासणी केली जाईल. त्यानंतरच परवाना निलंबनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

750 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क