छत्रपती संभाजीनगर : सिडको आणि हर्सूल परिसरात घरफोडी, शटरफोडी, उघड्या घरातून चोरी तसेच मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ गुन्ह्यांची उकल केली असून, आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही आणि मोटारसायकल असा ७ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिडको पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. याप्रकरणी नईम शाह उर्फ चुन्नू उस्मान शाह (वय ३७), सुभान शेख इसाक शेख (वय २२) आणि शेख मोहसीन शेख जाफर (वय ३६) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सिडको व हर्सूल भागात घरफोडी, शटरफोडी आणि उघड्या घरातून चोरी केल्याची कबुली दिली. नर्मद शाह उस्मान शाह याने घरफोडीत चोरलेले दागिने पत्नीच्या घरी फकीरवाडी येथे ठेवल्याचे सांगितल्याने तेथून मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सुभान शेख इसाक याने चोरी केलेला टीव्ही हर्सूल येथून जप्त करण्यात आला. आरोपींकडून चोरीचे सोने शेजारी राहणाऱ्या सोनाराकडे विक्री केल्याची माहितीही समोर आली. सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोने शेख मोहसीन याच्याकडून जप्त करण्यात आले.

या आरोपींकडून घरफोडीचे आठ, शटरफोडीचा एक, उघड्या घरातील चोरीचा एक आणि मोटारसायकल चोरीचा एक, असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय सिडको आणि हर्सूल पोलीस ठाण्यातील आणखी दोन गुन्ह्यांमध्येही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

776 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!