Oplus_131072

jagadguru-shantigiriji-maharaj-honored-at-kumbh-2025

कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित समर्थ सदगुरु स्वामी शांतीगिरिजी महाराज यांना श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्यांच्या वतीने जगदगुरु पदवी प्रदान करण्यात आली. या भव्य सोहळ्यात अनेक वरिष्ठ संतांची उपस्थिती लाभली.

श्री शंभू पंच दशनाम जुना आखाड्याच्या सर्व गुरुमूर्तींच्या प्रेरणेने व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जुना आखाडा पिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा भव्य पट्टा अभिषेक सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील संत परंपरेतील थोर संत स्वामी शांतीगिरीजी महाराज हे महाराष्ट्रातील पहिले संत आहेत, ज्यांना जुना आखाड्याने जगदगुरु उपाधीने सन्मानित केले आहे.

प्राचीन परंपरेचे पालन व अखाड्याचा सन्मान

भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि प्रचारासाठी आद्यगुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या अखाड्यांमध्ये ‘श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा’ हे एक मान्यताप्राप्त अखाडा आहे. येथे नागा साधूंपासून महान संतांचा समावेश असतो. जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी निष्काम कर्मयोगाने अखाड्यातील श्रेष्ठ स्थान मिळवले होते. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी जप, तप, अनुष्ठान, गोसेवा, गुरुकुल व श्रमदान यासारख्या परंपरा अविरतपणे पुढे नेल्या आहेत.

१०८ हून अधिक आश्रमांचे संचालन

स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी प्राचीन भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर १०८ पेक्षा अधिक आश्रमांची स्थापना केली आहे. त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेत श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्याने त्यांना जगदगुरु पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण

या प्रतिष्ठित उपाधीने महाराष्ट्रातील संत परंपरेचा मोठा सन्मान वाढला आहे. जय बाबाजी भक्त परिवारासह संपूर्ण देशभरातील संत-महंत, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून जगदगुरु शांतीगिरीजी महाराज यांचे अभिनंदन होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

833 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क