Online Loan Fraud: Man Duped of Lakhs by Fake Finance Agent
छत्रपती संभाजीनगर: ऑनलाईन कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत एका व्यक्तीची लाखोंची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एजंटनेच ग्राहकाला लाखोंचा गंडा घातला.
फिर्यादी रघुनाथ बालप्पा कुंभार यांनी नावी फायनान्स या संस्थेतून यापूर्वी कर्ज घेतले होते आणि ते वेळेवर फेडले होते. याच पार्श्वभूमीवर आरोपी राकेश अंजुटे याने त्यांच्याशी संपर्क साधून अधिक कर्जाची ऑफर दिली. रघुनाथ यांनी २० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले.
काही ओटीपीची देवाणघेवाण झाल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या खात्यात ८३ हजार रुपये जमा झाले. त्यानंतर ३ लाख ८३ हजार रुपये आले. मात्र, संपूर्ण २० लाख मिळाले नाहीत. आरोपीने ही रक्कम चुकीने जमा झाल्याचे सांगत ती परत मागितली. विश्वास ठेवून फिर्यादीने पैसे परत पाठवले. मात्र, त्यानंतर आरोपी गायब झाला आणि उर्वरित रक्कमही मिळाली नाही.
आता फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावला जात आहे. सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फसवणुकीतील आरोपी राकेश अंजुटे आणि प्रतीक बंटी यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*