Shivjayanti Procession Traffic Restrictions Aurangabad
छत्रपती संभाजीनगर: 🏰 श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी मिरवणुका 🚩, सांस्कृतिक कार्यक्रम 🎭 आणि अभिवादन समारंभ आयोजित करण्यात आले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर होणाऱ्या मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे वाहतूक नियमन 🚦 व मार्गबंदी 🚧 लागू करण्यात आली आहे.
🚗 कोणते रस्ते बंद राहणार?
👉 दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ९.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत आणि
👉 दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत
खालील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील:
1. गोपाल टी पॉईंट ते सिल्लेखाना चौक 🚫
2. क्रांती चौक उड्डाणपुल पूर्व आणि पश्चिम सेवा रस्ते 🚫
3. राजाबाजार चौक – संस्थान गणपती – शहागंज – सिटी चौक – गुलमंडी – पैठणगेट – सिल्लेखाना – क्रांती चौक – गोपाल टी 🚫
4. सिडको एन-१२ नर्सरी – टीव्ही सेंटर – जिजाऊ चौक – पार्श्वनाथ चौक – शिवाजी महाराज पुतळा – चिस्तीया चौक 🚫
5. जयभवानी नगर चौक – गजानन महाराज मंदिर – सेव्हन हिल उड्डाणपुल – आदिनाथ चौक 🚫
🔄 पर्यायी मार्ग (Alternative Routes)
✅ शहागंज ते सिटी चौक: चेलीपुरा – लोटा कारंजा – कामाक्षी लॉज मार्गे
✅ क्रांती चौक ते सिटी चौक: सावरकर चौक – कार्तिकी हॉटेल – मिलकॉर्नर – भडकल गेट मार्गे
✅ मिलकॉर्नर ते औरंगपूर: अंजली टॉकीज – नागेश्वरवाडी – निराला बाजार – समर्थनगर मार्गे
✅ जिल्हाधिकारी कार्यालय ते टीव्ही सेंटर: अण्णाभाऊ साठे चौक – सिद्धार्थ नगर चौक मार्गे
✅ जयभवानी नगर ते गजानन महाराज मंदिर: जालना रोड मार्गे
🚨 वाहतूक नियमांचे पालन करा!
➡️ पोलिस, रुग्णवाहिका 🚑, अग्निशमन 🚒 आणि अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू राहील.
➡️ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मो.वा. कायदा, म.पो. कायदा कलम १३१ अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) धनंजय पाटील यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*