harshvardhan-jadhav-arrested-in-assault-case
नागपूर – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर थेट कारागृहात पाठवण्यात आले आहे. पोलिस कर्मचार्याला मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. सोमवारी त्यांनी न्यायालयात हजर राहून अटक वॉरंट रद्द करण्याचा अर्ज केला, मात्र न्यायाधीश एस. एम. जी. बैस यांनी तो फेटाळून अटक आदेश दिला.
काय आहे प्रकरण?
१७ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरच्या वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू होती. सुरक्षा रक्षकांनी बाहेरच्या लोकांना प्रवेश नाकारला. यावेळी हर्षवर्धन जाधव हॉटेलमध्ये जाण्यासाठी आग्रही होते. सुरक्षा ताफ्यातील पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना अडवले, त्यावर जाधव यांनी पोलीस अधिकाऱ्याला थप्पड मारली आणि तेथून निघून गेले. या प्रकरणात सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून खटला न्यायालयात दाखल केला.
अटक आणि रुग्णालयात दाखल
सत्र न्यायालयाने न्यायालयीन तारखांना अनुपस्थित राहिल्याने जाधव यांना अटक करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी अंमलबजावणी करताच जाधव यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
न्यायालयीन निर्णयामुळे मोठी चर्चा!
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जाधव यांच्यावर झालेली कारवाई हा मोठा धक्का मानला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*