Chain Snatching in Aurangpura: Now Even Men Targeted
छत्रपती संभाजीनगर : शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरटे आता महिलांपुरतेच मर्यादित न राहता पुरुषांनाही लक्ष्य बनवत आहेत. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी, औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानासमोर एक धक्कादायक घटना घडली. सुनीलकुमार चांदवाणी हे त्यांच्या कामानिमित्त जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चांदवाणी यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याचा प्रतिकार केला, त्यामुळे चोराच्या हाती केवळ चेनचा काही भागच लागला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेची तक्रार क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे.
शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना आखल्या आहेत. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान दागिने घालण्यास नागरिकांनी टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाला या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावी लागणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*