copy-case-kalpataru-college-vaijapur

वैजापूर : तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या जीवशास्त्राच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कॉपी गैरप्रकार उघडकीस आला. शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने अचानक भेट देताच इमारतीच्या आजूबाजूला गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीत आणि इतर कॉपी साहित्य आढळून आले.

भरारी पथकाने केंद्रात प्रवेश करताच परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकांसह कॉपी साहित्य दालनाबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. संस्था अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक आणि १५ पर्यवेक्षकांनी परीक्षा प्रक्रियेत गंभीर दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ही बाब गंभीर मानून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वैजापूर यांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, अहवालानंतर संस्था आणि केंद्र संचालकांवरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात एका विद्यार्थ्यालाही कॉपी गैरमार्ग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाच्या या कठोर कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,184 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क