Woman’s gold chain snatched near temple on Mahashivratri
छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेची सुरक्षा धोक्यात आली. वाळूजमधील स्वरूप नगर येथे सकाळी १० वाजता दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील १३.५ ग्राम वजनाचे मिनी गंठण हिसकावून पलायन केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
महिला आपल्या कॉलनीतील मैत्रिणींसोबत श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी निघाली असताना दोन भामटे दुचाकीवरून आले. त्यातील एकाने वेगात येत महिलेच्या गळ्यातील गंठण ओढले आणि काही क्षणांतच पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता एका ठिकाणी आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*