LPG-Price-Hike-March-2025
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांपासून ते लघु उद्योगांपर्यंत सर्वांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
१ मार्च २०२५ पासून १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमतीत ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत आता या सिलिंडरचा दर १८०३ रुपये झाला आहे, जो यापूर्वी १७९७ रुपये होता. मुंबईत किंमत १७४९.५० वरून १७५५.५० रुपये झाली आहे, तर चेन्नईत १९६५ रुपये झाली आहे.
दरम्यान, घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी, हॉटेल मालक आणि व्यावसायिकांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे. हॉटेलच्या मेनू कार्डमधील पदार्थांच्या किमती वाढू शकतात.
मार्च महिन्यात होळी आणि रमजानसारखे मोठे सण असल्याने या दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचे बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*