grand-shiv-mahapuran-katha-mayurpark-2025

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक छत्रपती संभाजी नगर येथे येत्या ६ ते १२ मार्च दरम्यान मयुरपार्क येथे भव्य शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या दिव्य सोहळ्यात श्री कुबेरेश्वर धाम, सिहोर येथील पं. राघवजी प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथा होणार असून महादेव भक्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

६ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून भव्य शोभायात्रेने या कथेस प्रारंभ होणार आहे. आयोजन समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधांची विशेष व्यवस्था केली आहे. पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, अग्नीशामक यंत्रणा, महिला सुरक्षा, अन्नदान आणि निवास व्यवस्था यासाठी हजारो स्वयंसेवक अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.

यावेळी राज्यभरातील विविध संत-महंतांचे पूजन होणार असून २,००० हून अधिक सेवेकरी निस्वार्थ सेवा देणार आहेत. आयोजक माजी उपमहापौर विजय औताडे यांनी महादेव भक्तांना मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अनाथ कन्येचा विवाह – शिवविवाह सोहळा

माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ भगवान बाबा बालीकाश्रमातील अनाथ कन्या शालिनी हिचा शुभम उद्धव कुलकर्णी यांच्याशी विवाह १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे. या शिवविवाह सोहळ्यास सर्व भक्तांनी उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,738 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क