Ladki Bahin Yojana February Installment on Women’s Day Eve

मुंबई: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चच्या पूर्वसंध्येला त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून या योजनेवर विरोधकांकडून टीका होत असली, तरी सरकारकडून लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 40 लाख महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे आणि फेब्रुवारी महिन्यातही त्याच प्रमाणात महिलांना लाभ मिळणार आहे.

हप्ता 2100 रुपयांपर्यंत वाढणार?

अदिती तटकरे यांनी योजनेच्या पुढील नियोजनाबाबतही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, फेब्रुवारीचा हप्ता निश्चितपणे वेळेवर मिळेल, तर मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

महिलांचे आर्थिक सबलीकरण हा मुख्य उद्देश

सरकार महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून काम करत आहे. महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या मदतीने स्वतःच्या उद्योग-व्यवसायाकडे वळावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,316 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क