छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा एमआयडीसीतील जालना रोडवरील लिभर चौकात सोमवारी (३ मार्च) रात्री पावणेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बसची (एमएच २० जीसी २२०९) एमआयडीसीतून येणाऱ्या स्कूटरला (एमएच २० एफएक्स ९१४६) जोरदार धडक बसल्याने स्कूटरवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची ओळख गौतम लक्ष्मण साळवे (वय ५०) आणि साहेबराव हरिभाऊ त्रिगोटे (वय ६०, दोघेही रा. कुंबेफळ, ता. छत्रपती संभाजीनगर) अशी करण्यात आली आहे. अपघातानंतर दोघांचे मृतदेह बसखाली अडकल्याने काही काळासाठी जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आणि नागरिकांनी प्रयत्न करून मृतदेह बसच्या खालील भागातून बाहेर काढले.

गौतम साळवे हे शेंद्रा एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. तर साहेबराव त्रिगोटे हे मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर काही वेळ बसचालक घटनास्थळी थांबला होता, मात्र नंतर तो फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला येथे वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,327 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क