Strict Security for Holi and Ramzan in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर: धूलिवंदन आणि रमजान महिन्यातील शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सुमारे 1500 पोलीस, 31 पोलीस निरीक्षक, 96 सहाय्यक निरीक्षक आणि 300 महिला पोलीस बंदोबस्तावर तैनात असतील.
सणाच्या दिवशी शहरात रंग खेळण्यावरून होणारे वाद, महिलांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. सकाळी 6 वाजल्यापासूनच बंदोबस्त सुरू होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. संवेदनशील भागात दिवसभर गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
असा असेल पोलिस बंदोबस्त:
- 3 उपायुक्त, 5 सहाय्यक पोलीस आयुक्त, 31 निरीक्षक, 96 सहाय्यक निरीक्षक, 1500 पोलीस, 300 महिला अंमलदार तैनात.
- 17 ठिकाणी मोबाईल पेट्रोलिंग तर 85 संवेदनशील भागांत तपासणी नाके.
- 110 आरपीएफचे शस्त्रधारी जवान आणि 600 होमगार्ड सज्ज.
- 100 पोलीस अधिकारी आणि अंमलदार साध्या वेशात गस्त घालणार.
धूलिवंदन हा रंगांचा सण आहे, मात्र काही ठिकाणी जबरदस्ती रंग लावण्याचे प्रकार घडतात. तसेच, टवाळखोरांकडून महिलांना त्रास दिला जातो. त्यामुळे पोलिसांनी कडक नजर ठेवण्याचे ठरवले आहे.
सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी रंगोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख नियोजन केले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*