छत्रपती संभाजीनगर : शहरात २०१९ पासून सुरू असलेल्या स्मार्ट सिटी बस सेवेचे प्रवासी भाडे १६ एप्रिल २०२५ पासून २० टक्क्यांनी वाढवण्यात येत आहे. २०२२ पासून जुन्या भाडेदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, बस देखभाल, स्पेअर पार्ट्स, आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ झाल्याने ही दरवाढ अनिवार्य झाली आहे. जानेवारी २०२५ पासून किमान वेतनात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे ही आर्थिक गरज निर्माण झाली आहे.

भाडेवाढ एक रुपयाच्या पटीत ठेवण्यात आली असून, सुट्ट्या पैशाची अडचण टाळण्यासाठी वाहकांकडे सुट्टे पैसे उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन (युपीआय) पेमेंटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या मार्गावरील सध्याचे व सुधारित भाडे (रु. मध्ये):

1. सिडको – रांजणगाव: 35 → 42

2. सिडको – जोगेश्वरी: 40 → 48

3. सिडको – करमाड: 40 → 48

4. सिडको – फुलंब्री: 45 → 54

5. सिडको – रेल्वे स्टेशन: 25 → 30

6. हसुल टी पॉइंट – फुलंब्री: 35 → 42

7. मध्यवर्ती बसस्थानक – हसुल टी पॉइंट: 25 → 30

8. रेल्वे स्टेशन – बिडकीन: 35 → 42

9. रेल्वे स्टेशन – मध्यवर्ती बसस्थानक: 15 → 17

10. मध्यवर्ती बसस्थानक – वेरुळ: 50 → 60

11. सिडको – बाबा पेट्रोल पंप: 20 → 23

12. औरंगपुरा – वाळूज पो. स्टे.: 35 → 42

13. औरंगपुरा – नाईकनगर: 30 → 36

14. औरंगपुरा – हिंदुस्तान आवास: 30 → 36

15. सिडको – विद्यापीठ: 30 → 36

16. सिडको – मध्यवर्ती बसस्थानक: 25 → 30

17. मध्यवर्ती बसस्थानक – फुलंब्री: 45→ 54

या दरवाढीमुळे स्मार्ट सिटी बस सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

1,262 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क