मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जालना येथून बीडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना अचानक रस्त्यात भोवळ आल्याने त्यांचा दौरा तातडीने रद्द करण्यात आला. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. विनोद तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांना उष्माघात (सनस्ट्रोक) आणि अतिसाराचा त्रास झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्या प्रकृतीची परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या मराठवाड्यात तापमानाने उच्चांक गाठला असून, काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या तीव्र उष्णतेचा फटका मनोज जरांगे पाटील यांनाही बसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सतत बैठका घेत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,117 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क