फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ५ मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर निकालाच्या तारखेबाबत अनेक अफवा पसरत होत्या. मात्र, शिक्षण मंडळाने स्पष्टता देत सोमवारी दुपारी एक वाजता निकाल घोषित होईल, असे सांगितले आहे.

या परीक्षेसाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :

https://results.digilocker.gov.in

https://mahhsscboard.in

https://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

गुणपडताळणीसाठी अर्ज मंगळवारपासून सुरू

निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल. ही प्रक्रिया मंगळवार (ता. ६ मे) पासून सुरू होणार असून २० मेपर्यंत अर्ज करता येतील. संबंधित शूल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.

उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

639 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क