छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा सहन करत असलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान विभागाने दिली आहे. पुढील आठवड्यात तापमानात आणखी घट होणार असून, काही भागांत गारांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या जनतेला काहीसा आराम मिळण्याची चिन्हे आहेत.

२८ एप्रिलच्या तुलनेत ४ मे रोजी शहरातील तापमान साडेतीन अंशांनी घटून ३९ अंशांवर पोहोचले. येत्या १० मेपर्यंत तापमानात सातत्याने घट होऊन पारा ३६ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील पंधरवड्यात ४३ अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे शहरात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, आता हवामानात हळूहळू बदल होत असल्याचे चित्र आहे.

गुरुवारी गारांसह पावसाची शक्यता

८ मे रोजी जिल्हाभरात विजांच्या कडकडाटासह गारांसह पावसाची शक्यता असून, या दिवशी दिवसभर आकाश ढगाळ राहणार आहे. किमान तापमान २४ अंश, तर कमाल तापमान ३७ अंशांदरम्यान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ५ ते ७ मे दरम्यान देखील काही भागांत गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता असून, संभाव्य पावसामुळे हवामानात गारवा निर्माण होणार आहे. मात्र, विजांसह वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

698 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क