छत्रपती संभाजीनगर : फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज (सोमवार) दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाचा एकूण निकाल ९२.२४ टक्के लागला आहे. हा विभाग मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला असून, निकालात यंदाही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांतील एकूण १ लाख ८१ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७९ हजार ९०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून तब्बल १ लाख ६५ हजार ९६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाचा निकाल गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक असून, अनेक शाळांमध्ये १०० टक्के निकाल लागल्याची माहिती आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

610 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क