छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीतीदायक घटना घडली आहे. डॉक्टर दांपत्याच्या गाडीवर दरोडेखोरांनी हल्ला करून सुमारे ११ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली असून, चिकलठाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहकर येथे नातेवाइकाच्या लग्नाहून पालघरला परतणाऱ्या शिंगणे कुटुंबाच्या कारचा पाठभाग दुसऱ्या कारने धडकवण्यात आला. हे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली. तेवढ्यात चार दरोडेखोर त्या कारमधून उतरले आणि शिंगणे कुटुंबावर अचानक हल्ला चढवला. त्यांनी मारहाण करत महिलांचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.

लुटलेला ऐवज पुढीलप्रमाणे :

  • दीड तोळ्याचं मणी मंगळसूत्र (₹१ लाख)
  • चार तोळ्यांची सोन्याची पोत (₹३ लाख)
  • लक्ष्मी हार (₹१.५ लाख)
  • लहान पोत (₹१.५ लाख)
  • मोठी पोत (₹४ लाख)
  • मोबाईल (₹१२ हजार)

एकूण अंदाजित नुकसान : ₹११ लाख १२ हजार

या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर रात्री प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे रात्री प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच, दरोड्याच्या या घटनेने सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,145 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क