जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले असून, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये ७ मे रोजी ही मॉकड्रिल होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाही या मॉकड्रिलमध्ये सहभागी होणार आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार १९७१ नंतर प्रथमच अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल घेतली जात आहे. यासाठी देशातील एकूण २४४ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याशिवाय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल डिफेन्स अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

२०१० च्या अधिसूचनेनुसार सिव्हिल डिफेन्स जिल्ह्यांचे तीन गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कॅटेगिरी ३ मध्ये असून, येथील यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या मॉकड्रिलमधून दहशतवादी हल्ला किंवा आपत्तीजन्य परिस्थितीत यंत्रणांची प्रत्यक्ष कृती तपासली जाणार असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,731 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क