छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून त्रास देण्याच्या प्रकरणात बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गायत्री दाभाडे या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तीला आरोपी दत्तू गायके गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता आणि प्रेम स्वीकारले नाही तर आत्महत्या करेल अशी धमकी देत होता. त्यामुळे भीतीपोटी गायत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, छत्रपती संभाजीनगरमधील इंदिरानगर परिसरात आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यामुळे जावयाची हत्या केल्याची घटना घडली होती. दोन्ही घटनांमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.